Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

आर्त हाक | Gadchirolikar



मध्यरात्रीच्या अंधारात चाचपडत प्रवास करतांना वरून येणाऱ्या पावसांच्या सरी चेहऱ्यावर, कानशिलात बसत होत्या, त्याच वेळी माझ्या शेतकरी राजांच्या पावसाच्या प्रतिक्षेचे बिंब मला दिसत होते.

आर्त हाक 

देऊनी वरूणास हाक

खाल्ली सरींची चपराक |

 

हेचि मागणी देवास

फक्त हेचि रे आस |


सोड कमरेचा हात

लाव त्यास अभाळास |


थोडे ढगांना हलव

माझ्या गावास भिजव |


पहावेना मज खंत

दिला हाकेला मी कंठ |


सरी आली वरूनाची 

त्यास होती आर्त हाक |


जरी सरींची चपराक

तरी होती आर्त हाक |


- गडचिरोलीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या